Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? तरुणीला मारहाण केली, कपडे फाडले अन्…, उडाली खळबळ

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील केदारीनगर येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि मुलगी हे दोघेही एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे या सगळ्यांमध्ये ओळखी होती. टेरेसवर मुलगी फिरत होती. त्यावेळी मुलांनी या मुलीला सोसायटीचा कॉमन परिसर वापरण्यास मनाई केली. Pune Crime
याच कारणावरुन मुलीला शिवीगाळ केली आणि तिला हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने थेट या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या फोनचंदेखील चांगलंच नुकसान केलं आहे. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.