Pune Crime : महिलेने वडापाव देण्याच्या बहाण्याने तरुणीला घरी नेले अन् महिलेच्या पतीने केला अत्याचार, घटनेने पुणे हादरले..


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओळखीच्या असलेल्या महिलेने एका १९ वर्षाच्या मुलीला वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी नेले. तरुणीला घरात सोडून महिला बाहेर गेली असता महिलेच्या पतीने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

हा प्रकार बुधवारी (ता.३) दुपारी दोन ते रात्री साडे अकराच्या दरम्यान कात्रज परिसरात घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी पीडित १९ वर्षाच्या मुलीने शुक्रवारी (ता.५) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रल्हाद सखाराम साळुंके (वय.४८ रा. कात्रज) व त्याच्या पत्नीवर (वय.४५) गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भाजी मंडई येथे पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या ओळखीची आरोपी महिला भेटली. महिलेने तरुणीला गोड बोलून तिच्या राहत्या घरी घेऊन गेली. तरुणीला वडापाव देण्याचा बहाणा करुन तिला एकटीला घरात ठेवून बाहेर निघून गेली. Pune Crime

महिलेने घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून महिलेच्या पतीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. पतीच्या या कृत्याला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!