Pune Crime : ‘तो’ संशय ठरला जीवघेणा! पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीचा गळाच चिरला, घटनेने पुणे हादरलं…

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन खून केल्याची घटना पुण्यातील येरवडा (Pune Crime) भागात घडली. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशयातून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.९) घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)
रूपाली भोसले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आशिष भोसले असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
रूपाली भोसले आणि आशिष भोसले यांचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले होते. आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती. त्यांना एक ७ महिन्याची मुलगी देखील आहे.
मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिषला आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणे केले. शनिवारी (ता. ९ ) रात्री आशिषने जोरदार भांडणे करून रुपालीला शिवीगाळ केली.
या दरम्यान आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याच्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.