Pune Crime : जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
जेवण बनवले नाही म्हणून पतीने पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकून वार करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हडपसर परिसरात झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे गुरुवारी (ता.१) रात्री साडेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकणी नमिता श्रावण माने (वय. ३३रा. जी एत कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन श्रावण राम मान (वय.३७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, घरगुती कारणावरुन व जेवण बनवले नाही या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद सुरु होता. वाद सुरु असताना आरोपी पतीने घरातील कांदा कापण्याच्या चाकूने पत्नी नमिता हिच्या हातावर वार केले. तसेच तिला मारहाण करुन जखमी केले. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.