Pune Crime : इंजिनिअर मुलगी डिलिव्हरी बॉयच्या प्रेमात पडली, आईने विरोध करताच तरुणाचं धक्कादायक कृत्य, घटनेने पाषाण हादरलं…
Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक कारणासाठी अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रेयसीची आई त्यांच्या नात्याच्या विरोधात होती, त्यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाले होतं. हाच राग मनात धरुन त्याने प्रेयसीच्या आईला संपल्याची घटना उघडकीस आली आहे. पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. Pune Crime
वर्षा क्षीरसागर (वय.५८) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. शिवांशू दयाराम गुप्ता (वय.२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकणी मृण्मयी क्षीरसागर (वय.२२) हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मृण्मयी कम्प्युटर इंजिनिअर आहे. एक जानेवारी रोजी मृण्मयीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर तिने नोकरी सोडली होती. सात महिन्याआधी मृण्मयीची डेटिंग ॲपद्वारा शिवांशू गुप्ता याच्यासोबत ओळख झाली होती. पहिल्या भेटीमध्ये दोघांना एकमेंवर प्रेम जडलं होतं.
काही महिन्यापूर्वी याबाबत शिवांशू डिलिव्हरी बॉय असल्याचं मृण्मयीला समजलं. पण मृण्मयीची आई या नात्याच्या विरोधात होती. शिवांशुची नोकरी आणि आर्थिक स्थिती बरोबरीची नसल्याचं ती समजत नव्हती. त्यामुळे तिने मृण्मयीला या नात्यातून बाहेर येण्याचा सल्ला दिला होता. वडिलांना गमावलेल्या मृण्मयीने आईचं म्हणणं मानलं अन् शिवांशुसोबत ब्रेअकअप केले. त्याला भेटणंही बंद केले.
त्यानंतर नाराज प्रियकर शिवांशु गुप्ता एका रात्री मृण्मयीच्या घरी पोहचला. आई त्याला ओळखत होती, तिने त्याला घरी घेतले. घरात गेल्यानंतर शिवांशु गुप्ता याने लग्नासाठी वर्षा क्षीरसागर यांना मनवण्याचा प्रयत्न केला. पण वर्षा यांनी त्याचं ऐकलं नाही.
त्यानंतर त्याने रागाच्या भरात बेल्टने वर्षा यांचा गळा आवळून खून केला. या हत्येवेळी मृण्मयी घटनास्थळी उपस्थित होती की, नाही याबाबत अद्याप समजलं नाही. वर्षा यांचा खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
दरम्यान, मृण्मयीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. आरोपी खून केल्यानंतर घरी जाऊन लपला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. या खूनामध्ये मुलाचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत