Pune Crime : सोसायटीमधील पार्किंगवरून झाला वाद, थेट गोळीबार, घडला मोठा थरार,पुण्यातील घटना…


Pune Crime : पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादातून माजी सैनिकाने एकावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. अशोक नगर परिसरात एका सोसायटीमध्ये दुचाकीच्या पार्किंग वरून सोसायटीमधील दोघांमध्ये वाद झाला.

यामध्ये एका माजी सैनिकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला ताब्यात घेतले आहे. मात्र किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने चक्क गोळीबार झाल्याचे घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime

पुण्यातून अशीच एक दुसरी घटना उजेडात आली आहे. पुण्यात दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असल्याची ही घटना आहे. यात वडगाव ब्रिज ते वारजे ब्रिजपर्यंत हातात बंदूक घेऊन दहशत पसरवण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यात हातात बंदूक घेऊन आणि गाडी चालकांना धमकावत तरुण गाडी चालवत होता. हातात बंदूक घेऊन रस्त्यावर नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार केला गेलाय. या संपूर्ण प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेत या तरुणांचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!