Pune Crime : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तीन वाहनांची तोडफोड, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा..
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज करुन चारजणांनी सोसायटीच्या पार्कींगमध्ये पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील साईनगर येथे घडला आहे.
याप्रकणी प्रकाश बालाप्पा पुजारी (वय.५०रा. कमान पॅराडाईज सोसायटी, साईनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.२९) फिर्याद दिली आहे. त्यानुसारमनोज चौधरी व त्याच्या दोन ते तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज त्याच्या इतर दोन ते तीन मित्रांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज करुन घेऊन रागाच्या भरात फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली.
तसेच ढकलून देऊन दरवाजा लावुन घेतला. आरोपींनी तेथून जाताना त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने सोसायटीच्या पार्किंग मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. आरोपींनी तीन वाहनांची तोडफोड करुन पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.