Pune Crime : ‘तसले’ फोटो, व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, कर्वेनगर येथील घटनेने खळबळ..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवून एका महिलेचा विनयभंग केला. तर महिलेच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सुनिल शहाणे (रा. साततोटी पोलीस चौकी जवळ, कसबा पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आकाश शहाणे हा फिर्य़ादी यांच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याने फिर्य़ादी यांच्या मोबाईलवर महिला व पुरुषांचे न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवले. याचा जाब विचारला असता आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांच्या आणखी एका मैत्रिणीला आरोपीने अश्लील मेसेज केले. तसेच वारंवार फोन करुन त्रास देऊन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.