Pune Crime : आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार, संतापजनक घटनेने पुणे हादरलं…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अशातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४५ वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. Pune Crime

तसेच शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली.

पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!