Pune Crime : चिमुकल्याने अंगावर उलटी केली, आईच्या बॉयफ्रेंडला आला राग, इतकं मारलं की मुलाचा जीवच गेला, पुण्यात भयंकर घटना..
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
असं असतानाच प्रेयसीच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाने उलटी केल्याच्या रागातून त्याला बेदम मारहाण करून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत त्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने रागातून प्रियकराने मुलाला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
महेश कुंभार (रा. पंचवटी नाशिक) असेआरोपीचे नाव आहे. तर वेदांश काळे (वय 4 वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, (रविवार ता.१) सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने अचानक उलटी केली. त्यानंतर आरोपी महेश कुंभार चिडला. त्याने मुलाला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली. या घटनेत वेदांश बेशुध्द झाला, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारांदरम्यान वेदांशचा मृत्यू झाला. Pune Crime
आपला चार वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्याची आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल केले होते. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले, त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.
या चौकशीत पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती आणि तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पल्लवी आपल्या मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती.
जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने महेश चिडला. त्याने वेदांशला झाडूने मारहाण केली. तो बेशुध्द झाल्यावर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महेशला अटक केली आहे.