Pune Crime : लैंगिक अत्याचार करुन न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी, कोंढवा परिसरातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल, घटनेने उडाली खळबळ


Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime

भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून एका महिलेला कोंढवा परिसरात नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. एवढे नाही तर तिचे न्युड फोटो मित्राला दाखवून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कोंढवा येथील दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१० ते ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे. Pune Crime

कलीम सलीम शेख (वय.४५) आणि आश्रफ शेख (वय. २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या २९ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कलीम शेख याने ओळखीच्या असलेल्या फिर्यादी महिलेला भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून कोंढवा येथे घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने महिलेसोबत बळाचा वापर करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने याबाबत वाच्चता केली नाही. फिर्य़ादी घरी असताना आरोपी कलीम शेख हा घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये असलेले न्युड फोटो मित्र आश्रफ शेख याला दाखवून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!