Pune Crime : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध, प्रेयसीचा खून करुन तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील घटना..
Pune Crime : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक पुण्यातून समोर आली आहे. ही घटना हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये १३ मे रोजी मध्यरात्री एक ते १४ मे सकाळी नऊ या कालावधीत घडली आहे.
मोनिका कैलास खंडारे (वय.२४ रा. कसुरा ता. बळापुर, जि. अकोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०. कसुरा ता. बळापुर जि. अकोला) यानेही सिलिंग फॅनला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकाश खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे. Pune Crime
सविस्तर माहिती अशी की, मोनिका आणि आकाश गावाहून पळून पुण्यात आले होते. ते हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील स्पॉटलाईट हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने बेडशीटच्या सहाय्याने खोलीतील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, दोघेजण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हडपसर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन दोघांच्या कुटुंबियांची चौकशी केली. चौकशीमध्ये मोनिका आणि आकाश यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे दोघेजण पुण्यात पळून आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.