Pune Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
Pune Crime : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक हांडेवाडी (ता. हवेली) परिसरातून समोर आली आहे.
कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी फरार झालेल्या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.
सुदर्शन पुंडलिक शेरमाळे (वय २०, सध्या रा. हांडेवाडी, ता. हवेली, मूळ रा. मनमाड, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी ही बिझनेससंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी हांडेवाडी येथे जुलै २०२३ मध्ये क्लासला आली होती. तर आरोपी हा त्या क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. तेव्हा पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची ओळख झाली होती.
आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेला नोव्हेंबर महिन्यात एके दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडिता घरी गेल्यानंतर कपडे धुवत होती. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता घाबरल्याने तिने याची वाच्यता कोठेही केली नाही.
त्यामुळे याचा फायदा घेऊन आरोपीने पुन्हा पीडितेवर दोनदा बलात्कार केला.दरम्यान, पीडित तरुणीने याबाबत चाईल्ड हेल्पलाईन क्र. १८१ च्या मदतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी सुदर्शन शेरमाळे याच्यावर ‘पॉस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने पकडले आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.