Pune Crime : पुण्यात खळबळ! शिक्षकाने विद्यार्थीनीवर भर क्लासमध्ये केले धक्कादायक कृत्य, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल..
Pune Crime पुणे : शिक्षकाने विद्यार्थिनीचा भर क्लासमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नवले पूल परिसरात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
नरेंद्र जुवेकर (वय. ५५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नवले पुलाजवळ फुल स्टॉप डेव्हलपर्स या खासगी कोचिंग क्लासमध्ये कम्युनिकेशन क्लासचे नरेंद्र जुवेकर हे तक्रारदार यांच्या कपड्यांवर काहीतरी बोलून, तसेच कपड्यांवरील नाव मोठ्याने क्लासमध्ये घेऊन तक्रारदार विद्यार्थिनीला मनस्ताप दिला.
तसेच तक्रारदार यांच्या व्हॉट्सॲपचे स्टेटस पाहून चालू क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर म्हणाला की, क्या बुढो के साथ होली खेल रहे हो, मैं तो गोवा जाकर होली खेल रहा था! मेरी दस उंगलीया घी में थी और मेरे चारो बाजू लडकियां थी, असे मोठ्याने शब्दोच्चार करून, तक्रारदार विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.
नरेंद्र जुवेकर या शिक्षकाने विद्यार्थिनीला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने तिने घातलेल्या टॉपवरचे शब्द भर क्लासमध्ये उच्चारत तिचा मानसिक छळ केला. त्यानंतर, त्याच विद्यार्थिनीने ठेवलेला होळीचा व्हॉट्सॲप स्टेटस पाहून भर क्लासमध्ये अश्लील वक्तव्य करत विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.
दरम्यान, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे करीत आहेत.