Pune Crime : पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले! विकृतीच्या भयानक घटनेने पिंपरी चिंचवड हादरले…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हत्या, खून बलात्कारापासून ते कौटुंबीक हिंसेच्या घटना सातत्त्याने समोर येत आहे.

अशातच आता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

ही घटना ११ मे रोजी पिंपरी चिंचवड शहरात घडली असून १६ मे ला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. अद्याप ही तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Pune Crime

सविस्तर माहिती अशी की, हे दाम्पत्य नेपाळ येथील असून ते कामानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात राहत आहेत. आरोपी हा वॉचमनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे. दरम्यान, पत्नीवर पतीचा संशय होता. याचाच रग मनात धरून अकरा मे रोजी रात्री पती रागात घरी आला आणि पत्नीला मारहाण करु लागला.

त्यानंतर त्यांने घरातील ब्लेडने फिर्यादी यांच्या गुप्तांगावर वार केले. चाकू हातात घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. पती एवढ्यावरच न थांबला त्याने थेट ओढणीच्या साहय्याने पत्नीचे हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूने होल पडून त्यात पितळेचं कुलूप लावलं. या सगळ्याने पत्नीला गंभीर दुखापत झाली. पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!