Pune Crime : शाळेच्या शिपायचे धक्कादायक कृत्य! मुलावर लैंगिक अत्याचाराचा केला प्रयत्न, वाघोलीतील घटना…


Pune Crime : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून शाळांमध्ये धक्कादायक प्रकार घडत आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार घडण्याचे अनेक प्रकरण उजडेत आले आहेत. यानंतर संतप्त पालकांनी आंदोलने केली होती.

आता पुणे शहरातील वाघोलीत एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. १० वर्षीय मुलावर शाळेतील शिपायाने लज्जास्पद प्रकार केला आहे.

पुणे येथील वाघोली भागात राहणाऱ्या नामांकीत शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा धक्का मुलाचा पालकांना बसला आहे. या संदर्भात पिडीत मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.

त्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा १० वर्षीय मुलगा हा वाघोलीमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. १९ एप्रिल रोजी त्यांनी मुलाला नेहमीप्रमाणे शाळेमध्ये सोडले. त्या दिवशी शाळेत शिपाई असलेल्या एका व्यक्ती त्या मुलाकडे आला.

त्याने त्याची चौकशी सुरु केली. त्याचे नाव विचारले. त्यानंतर तू चित्रपट पाहतो की नाही असे विचारले. मुलाने ‘हो’ सांगितल्यावर आरोपी म्हणाला, मी तुला एक चित्रपट दाखवतो टॉयलेटमध्ये चल, असे सांगितले. Pune Crime

पिडीत मुलाने त्यांना नकार दिला. यावर आरोपीने येथीले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही असे सांगितले. त्यानंतर तो त्याच्यावर जबरदस्ती करू लागले. या कृतीला घाबरून पिडीत मुलगा पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गातमध्ये आला.

त्या मुलास म्हणाला, थांब, तुला येथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांच्या मोबाईलमध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली. तसेच या प्रकरणात कोणाला काही सांगू नको, अशी धमकी दिली. मुलाने हा प्रकार आईला सांगितला.

त्यानंतर त्या मातेने पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या संपूर्ण प्रकरणी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!