Pune Crime : पुणे हादरलं! बदनामी करण्याची धमकी, अन् चुलतीवर केले हे धक्कादायक कृत्य, घटनेने उडाली खळबळ..


Pune Crime  पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच नात्याला नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. Pune Crime

बदनामी करण्याची धमकी देऊन पुतण्याने चुलतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहे. याप्रकरणी पुतण्यावर पर्वती पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने गुरुवारी (ता. १९) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रील २०१६ ते डिसेंबर २०१९ दरम्यान कसबा पेठेत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा पुतण्या आहे. त्याने फिर्यादी यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला असता त्या ओरडल्या. त्यावेळी आरोपीने मी तुझ्या मुलींना व नवऱ्याला तसेच सगळ्यांना सांगेन की तूचमला वरती बोलावून घेतले.

फिर्यादी यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. तसेच त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळले.

दरम्यान, आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने गुरुवारी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!