Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून ती आपल्या मित्राला पाठवायची, पुण्यातील कॉलेजमध्ये धक्कादायक घटना, प्रशासन हादरले…


Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ आरोपी तरुणी आपल्या मित्रांना पाठवत होती. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रशासन हादरले आहे.

आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा अशी आरोपींची नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी आर्या हिने हॉस्टेलमध्ये चोरून विद्यार्थीनींचे व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. यानंतर हे दोघे सोशल मीडियावर या विद्यार्थीनींचे व्हिडिओ टाकत होते. याप्रकरणी आर्या आणि विनीत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

सीईओपी कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे कमी कपड्यातले व्हिडीओ आर्या शूट करायची. ते व्हिडीओ मित्र विनीतला पाठवत असे. या प्रकरणी सीईओपी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

तसंच पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्या गिरीश काळे या विद्यार्थिनीला निलंबीत करण्यात आल्याचे सीईओपी कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!