Pune Crime : धक्कादायक! घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, हडपसर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव करुन असभ्य वर्तन केल्याप्ररकणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (ता.१७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हडपसर परिसरात घडला आहे.

सोहेल उर्फ मोनु अन्सारी (वय. २२ रा. वैदुवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला घरात बसलेल्या असताना आरोपी अचानक घरात घुसला. त्याने महिलेकडे पाहून अश्लील हातवारे केले. त्यानंतर महिलेसोबत अश्लील चाळे करुन मराहाण केली. दरम्यान महिलेचे पती त्याठिकाणी आल्याने आरोपी तिथून पळून जाऊ लागला. Pune Crime

महिलेच्या पतीने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन पळून गेला. याबाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!