Pune Crime : पुण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनेने उडाली खळबळ, नराधमावर गुन्हा दाखल..

Pune Crime : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील कोरेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रतिक मुंडकर (वय. १९ पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी प्रतिक मुंडकर पीडित मुलीच्या वर्गात शिकतो. त्याने मुलीला कोरेगाव पार्क परिसरातील एका बिल्डिंगमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतिक विरोधात तक्रार दाखल केली. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कोंढवा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.