Pune Crime : धक्कादायक! नात्यातील मुलाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना..

Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नात्यातील एका तरुणाने दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करुन लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकणी पीडित मुलींच्या ३५ वर्षीय आईने मुंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.५) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार मुबारक बंदेनवाज खोडती (वय.२० रा. जमकंडी, कर्नाटक) याच्याव गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी फिर्यादी यांच्या पतीच्या मामाचा मुलगा आहे. फिर्यादी व त्यांचे पती बाहेर गेल्यानंतर त्यांच्या ११ आणि ९ वर्षीय अल्पवयीन मुली घरात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला बेडरुमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. Pune Crime
त्यावेळी तिने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नऊ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत