Pune Crime : माझ्या अंगात देव येतो, म्हणत महिलेवर बलात्कार, पुण्यातील भयंकर घटना, घटनेने सगळेच हादरले…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूच्या धाकावर महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच महिलेने या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. या पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तसेच काही महिन्यापूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीसोबत बलात्काराची घटना घडली होती. ही तरुणी आणि तिचा मित्र रात्री फिरण्यासाठी आले होते. यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली.
दरम्यान त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर तीन आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. Pune Crime
महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र, तरीही घडणाऱ्या गुन्ह्यांच प्रमाण कमी झालेलं नाही.