Pune Crime : बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरलं! मित्राकडूनच अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघड..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पीडीत मुलीच्या राहत्या घरी घडला आहे.
याप्रकणी पीडीत अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (ता.३) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच बिल्डींगमध्ये राहत असून ते एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने पीडीतेच्या घरात कोणी नसताना घरी येऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवले.
मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.