Pune Crime : धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवूनतरुणीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर भागात घडला आहे याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर व पीडित तरुणीच्या घरात घडला आहे.
याप्रकरणी काळेपडळ येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता.२७) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहिल अविनाश घुले (वय. २५ रा. हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने मुलीसोबत जवळीक साधून तिला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला पुणे-सोलापूर महामार्गावरील लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. Pune Crime
तसेच पीडित मुलीच्या घरात कोणी नसताना घरी येऊन अत्याचार केले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.