Pune Crime : कोंढव्यात भररस्त्यात गोळीबार! गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुणे हादरले..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या तोंडावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे.शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे.

हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाला असल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हा हल्ला पूर्व वैमानस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गायकवाड असे वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. कोंढव्यातील साळवे गार्डन समोर गोळीबााराची घटना घडली आहे. गायकवाड यांच्या गाडीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी वरती दोन ते तीन गोळ्या झाडल्या आहेत.

तरुणांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत असून यामध्ये पोलिसांना यश आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतला आहे.

दरम्यान, दिलीप गायकवाड गोळीबारात जखमी झालेल्या वाळू व्यवसायिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल झाल्या असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!