Pune Crime : नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापाकडून लैंगिक शोषण…
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील बुध येथे मागील एक वर्षापासून ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घडली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने सोमवारी (ता.१) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नराधम बापावर नुसार गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी पती -पत्नी असून, त्यांना १३ वर्षांची मुलगी व १० वर्षाचा मुलगा आहे. आरोपीने दारु पिऊन मुलांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले.
पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.