Pune Crime : कोंढव्यात संतापजनक घटना! पार्किंगमध्ये बसून अश्लील चाळे, चड्डी, बनियनवर….
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिला कामाला जाण्याच्या वेळी मुद्दाम चड्डी, बनियनवर अश्लिल हावभाव करुन महिलेला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्च २०२३ पासून ३० सप्टेबर २०२४ या कालावधीत सुरु होता.
शेवटी या रोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रल्हाद आणि संतोष या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत रहायला आहेत. प्रल्हाद याला फिर्यादी यांनी सोसायटीत राहणे आवडत नव्हते. त्यामुळे तो काहीना काही कारण काढून त्यांच्यासोबत वाद निर्माण करत असे. संतोष याने फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न केला. Pune Crime
मात्र, त्यांनी कधीच त्याला दाद दिली नाही. तेव्हा तो फिर्यादी यांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देऊ लागला. त्या जेथे गाडी पार्क करतात, बरोबर त्याठिकाणी संतोष याने स्वत:चा कॅमेरा बसविलेला होता. त्याचा अॅक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये आहे. त्यावरुन तो त्यांच्यावर पाळत ठेवत असे.
तसेच वारंवार त्यांचा गुपचुप पाठलाग करत होता. मात्र, त्रास असाह्य झाल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास सुकेशिनी जाधव करीत आहेत.