Pune Crime : तरुणांनो सावधान! क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यात तरुणाची ऑनलाईन फसवणूक.
पुणे : एका तरुणाची क्रेडिट कार्डची ई-केवायसी केली नसल्याचे सांगून दंड भरावा लागेल असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना पुण्यातून (Pune Crime) समोर आली आहे. याप्रकरणी एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी संतोष शिवाजी सरगर (वय. ४२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 916289779270 मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एका मोबाइल धारकाने फिर्यादी यांना फोन करुन त्यांच्या क्रेडिट कार्डची ई-केवायसी केली नसल्याचे सांगितले. ई-केवायसी केली नसल्याने तुम्हाला ४५०० रुपयांचा दंड भरावा लागेल असे खोटे सांगितले.
तसेच एक लिंक पाठवून त्यावर माहिती व ओटीपी टाकण्यास सांगितले. ओटीपी टाकल्यानंतर फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवरुन परस्पर ४५ हजार ६७५ रुपये कट झाले.
दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत. पुण्यात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डांद्वारे फसवणुकीच्या घटनेत वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे