Pune Crime : धक्कादायक! फटाके फोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सुरक्षा रक्षकाला बेड्या..


Pune Crime : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आई-वडिलांसोबत फटाके फोडण्यासाठी गेलेल्या साडेनऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील कल्याणीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला पोलसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Pune Crime

ही घटना शनिवारी (ता.११) रात्री दहाच्या सुमारास घडला घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षक विठ्ठल रावळ कांबळे (वय.४२ रा. लमाण वस्ती, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या कल्याणीनगर येथील एका सोसायटीत राहात असून त्या सोसायटीमध्ये आरोपी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शनिवारी (ता.११) रात्री पीडित मुलगी तिच्या आई-वडिल व मैत्रिणी सोबत सोसायटीच्या गेटवर फटाके फोडण्यासाठी गेली होती.

दरम्यान, त्यावेळी आरोपी विठ्ठल कांबळे यांनी फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने येरवाड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!