Pune Crime : पुण्यात खुनाचे सत्र सुरूच, आता गुलटेकडी परिसरात दोन भावांनी मित्राला संपवलं, भयंकर कारण आलं समोर..
Pune Crime : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पुण्यात निर्घुण हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात हडपसर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
सुनील सरोदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सुनील सरोदे या तरुणाची गुंडानी हत्या केली आहे. सुनील सरोद हा डायस प्लाट परिसरात राहतो. मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी त्याची हत्या केली असल्याचं कळत आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, सरोदे आणि कांबळे हे तिघे ही मित्र आहेत. ७ जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी सरोदेने त्याला मारहाण केली होती. याचा राग दोन्ही कांबळे बंधूंच्या मनात होता. याच रागातून मंगळवारी रात्री कांबळे बंधू त्याच्या घरी गेले. त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेश याला मारहाण सुरू केली.
दरम्यान, त्यावेळी सुनील मध्ये आला. आरोपीने कोयता काढून त्याच्या गळ्यावर वार केला. रोहन कांबळे, शिवशरण कांबळे हे दोघे ही नुकतेच जामीनावर बाहेर आलेले आरोपी आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.