Pune Crime : पुण्यात चाललंय काय? आता सिगारेट देण्यास विरोध केल्याने तरुणावर चाकुने वार, वानवडी परिसरातील घटना…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
दोन दिवसांपूर्वी सिगारेट ओढण्यास दिली नसल्याचा राग मनात धरुन तरुणाला कंपनी बाहेर बोलावून घेत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.१९) दुपारी चारच्या सुमारास रामटेकडी येथील बालाजी वेफर्स ॲड फरसाण कंपनीच्या गेट नं. 11 समोर घडला आहे.
याप्रकणी नविनकुमार देवतादिन नाईक (वय.२६ रा. मधुबन सोसायटी जवळ, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विठ्ठल जनार्दन देवकांबळे (रा. रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर), शिवम धोत्रे (रा. मांजरी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी याने आरोपी विठ्ठल याला सिगारेट ओढण्यासाठी दिली नाही. याचा राग त्याच्या मनात होता. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी बालाजी वेफर्स अॅन्ड फरसाण कंपनीत काम करत असताना विठ्ठल याने बाहेर बोलावून घेतले.
कंपनीच्या गेट नं. ११ समोरील रोडवर आरोपींनी नविनकुमार यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर शिवम धोत्रे याने त्याच्याकडे असलेल्या चाकु सारख्या शस्त्राने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.