Pune Crime News : पगारावरुन झाला वाद, कामगाराला बेदम मारहाण करुन खून, मालकांसह १३ जणांवर गुन्हा दाखल..


Pune Crime News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पगारावरुन होत असलेल्या वादातून कंपनी मालकासह इतरांनी कामागराला बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनी मालकांसह काही सामाजिक कार्यकर्त्याविरोधात आणि एका माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

हा प्रकार बुधवारी (ता.१) रोजी शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत घडला आहे. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलिसांनीतपास करुन हा खून असल्याचे उघडकीस आणले आहे.

अविनाश भिडे (वय. ३६) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनी मालक शेखर महादेव जोगळेकर (वय.५८ रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), प्रणव शेखर जोगळेकर (वय. २२), माजी पोलीस आणि राजकीय कार्यकर्ता दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (वय. ५३ रा. काकडे पॅलेसमागे, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (वय.२९ , रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह इतर 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी मयत अविनाश यांच्या पत्नी रेश्मा अविनाश भिडे (वय-30 रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. २) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचे पती अविनाश भिडे हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. या दोघांमध्ये पगारावरुन वाद होत होते. यापूर्वीही शेखर जोगळेकर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करुन माराहण करुन ऑफिस मधून हाकलून दिले होते. घटनेच्या दिवशी देखील त्यांनी आपसात संगनमत करुन अविनाश यांना बेदम मारहाण केली.

यामध्ये गंभीर जखमी होऊन अविनाश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता अविनाश यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!