Pune Crime News : पुणे हादरले! क्लिनिकमध्ये दारु पाजून तरुणीवर बलात्कार, डॉक्टरांवर गुन्हा दाखल..


Pune Crime News पुणे : पुण्यात महिलांच्या अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, तसेच महिलांच्या सुरक्षतेव देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Crime News)

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावून तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. शुभंकर महापुरे (वय. २६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नारायण पेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये शनिवारी रात्री (ता.२३ ) पावणे दहा वाजता घडला.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी डॉ. शुभंकर महापूरे यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांची ओळख वाढत गेली. डॉक्टराने तिला आपल्या क्लिनिकमध्ये जेवण करायला रात्री बोलावले होते.

दरम्यान, तेथे तिला बकार्डी नावाची रम पाजली. त्यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!