Pune Crime News : सावकारी पुन्हा एकदा बळावली! व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी, ३ सावकारांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..


Pune Crime News  पुणे : व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकी घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी अजय सिंग दुधानी, निहालसिंग टाक, बच्चनसिंग भोंड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राहुल बबन आवताडे (वय.२८ रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले आहेत. फिर्यादी हे मांजराई रिक्षा स्टँड जवळ दुचाकीवर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करुन व्याजाचे दररोजचे पैसे का देत नाही? अशी विचारणा केली.

दरम्यान, फिर्यादी राहुल आवताडे याने आरोपींना पैसे नसल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांची दुचाकी जबरदस्तीने काढून घेत पैसे आणून दिल्यानंतर दुचाकी मिळेल असे सांगितले. तसेच पैसे परत केले नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!