Pune Crime News : पुण्यात हातगाडी लावण्यावरुन महिलांच्यात झाला राडा, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न…
Pune Crime News पुणे : हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादात महिलेला मारहाण करुन तिच्या पतीच्या डोक्यात वडा पाव तळण्याची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. Pune Crime News
याप्रकरणी 28 वर्षीय महिला दिपाली गणेश मगर यांनी पुण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला गणेशचतुर्थीच्या दिवशी हा प्रकार घडला. दुपारी साडे चार वाजता हा प्रकार घडल्याने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, महिला मागील काही वर्ष ज्ञान प्रबोधिनीसमोरील बाजूला हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, त्या काल पुन्हा याच ठिकाणी आपली हातगाडी लावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी काही दिवसांपासून आपली हातगाडी लावणारी महिला देखील तिथेच होती. त्यानंतर तक्रारदार महिला आणि दुसरी हातगाडी लावणारी महिला यांच्यात वाद निर्माण झाला.
एकमेकींना शिवीगाळ केली. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. पतीच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई मारुन गंभीर जखमी केलं. पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी आता पोलीस तपासणी करत आहे. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात अनेक लहान मोठे विक्रेते येत असतात. त्यांच्याच अनेकदा वादावादी होत असते. किरकोळ हाणामारी झाल्याचे प्रकरणंदेखील घडतात. आता मात्र थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.