Pune Crime News : गोड बोलून मित्राने केला घात, हॉटेलवर नेलं अन् गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार, पुण्यातील घटना..

Pune Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime News

मित्रानेच एका बावीस वर्षे तरुणीला गोड बोलून पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलवर नेले. त्या ठिकाणी तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे
साहिलखा नन्हे पठाण (वय.२७, रा. अमलनेर स्टेशन रोड, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षे तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आरोपीने फिर्यादीला डेक्कन परिसरातील एनसीसी मुख्यालयाच्या परिसरात बोलावले.
त्यानंतर गोड बोलून फिर्यादीला तो पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने फिर्यादीला गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले.
या संपूर्ण प्रकाराचे त्याने व्हिडिओ आणि फोटो काढले. याबद्दल कोणाला सांगितले तर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.