Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग, पती आणि मुलांना मारुन टाकण्याची देऊन मागितली खंडणी, पुण्यातील वानवडी येथील घटना..


Pune Crime News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime News

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच पती आणि मुलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Pune Crime News

हा प्रकार जुलै २०२३ ते शनिवार (ता.२१) दरम्यान वानवडी येथे वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याप्रकरणी ३९ वर्षाच्या विवाहित महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धमेंद्रकुमार परमानंद ठाकूर उर्फ छोटू (वय. ४३ रा. दरभंगा, जि. दरभंगा राज्य बिहार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. आरोपीने फिर्यादी यांचे पती कामावर गेल्यानंतर त्यांचा दुचाकी आणि कारमधून वेळोवेळी पाठलाग केला. तसेच घराचा दरवाजा व खिडकी वाजवून त्रास दिला.

फिर्यादी व त्यांच्या मुलांचे फोटो काढून ते पतिला पाठवले. तसेच माझ्यासोबत लग्न कर नाहितर २० लाख रुपये दे, पैसे दिले नाहीतर पती आणि मुलांना जिवे मारेल अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

दरम्यान , आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!