Pune Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिली अन्…, कोंढवा परिसरातील घटनेने उडाली खळबळ..
Pune Crime News : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime News
अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime News
याप्रकरणी कोंढवा खुर्द परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीने शनिवारी (ता.२८) कोंढवा पोलीस ठाण्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन हौसलाल पांडे (वय. २१ रा. कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै २०२३ मध्ये पीडीत मुलीच्या घरी घडला होता.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी सचिन पांडे याने पीडित मुलीसोबत ओळख केली. तिच्याकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, मुलीने त्यास नकार दिला. १० जुलै रोजी पीडित मुलगी तिच्या घरी एकटी होती
त्यावेळी आरोपी घरी आला. त्याने जबरदस्तीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे करीत आहेत.