Pune Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने सपासप वार करुन खून, तीन अल्पवयीन मुलांसह ६ जण ताब्यात, हडपसर येथील घटना..
Pune Crime News पुणे : पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार हडपसरमधील मिरेकर वस्तीत घडला. ही घटना हडपसरमधील मिरेकर वस्तीत रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. Pune Crime News
स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
सनी रावसाहेब कांबळे (वय. २५), अमन साजिद शेख (वय. २२) आकाश हनुमंत कांबळे (वय. २३, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. मिरेकर वस्ती, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपीबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी स्वप्नील याच्या डोक्यावर लोखंडी हत्यारांनी वार करुन त्याला जीवे ठार मारले.
दरम्यान, सनी कांबळे व अमन शेख यांनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर त्याचा असाच मुडदा पाडू, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करीत आहेत़.