Pune Crime News : गोळीबाराचे लोण आता पुण्यात! एका व्यक्तीवर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले, घटनेने पुणे हादरले…

Pune Crime News : कल्याणचे पूर्व विभागाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. पैसा, प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात होता.
त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरेस भाईने गोळ्या झाडल्या आणि स्वत:ही आत्महत्या केली. लागोपाठ घडलेल्या या २ घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. त्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. Pune Crime News
पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी संध्याकाळी पुणे शहरातील एका हॉटेलबाहेर झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने ज्वेलरी दुकानाच्या मालकावर गोळीबार करून जखमी केले, त्यापूर्वी त्याने ऑटोरिक्षात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
दुकान मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) असे जखमी दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.