Pune Crime News : पुण्यात महिलांचे अपहरण करून १७ लाखांची मागितली खंडणी, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘अशी’ केली सुटका


Pune Crime News पुणे : स्वयंसेवी संस्था चालविणार्‍या महिलेसह दोघा जणींचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन १७ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र प्रकरण पोलिसात जाताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका करत दोघा सराईत गुंडांसह चौघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय. ४५, रा. उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय. ३९, रा. एरंडवणा), प्रदिप प्रभाकर नलवडे (वय. ३८, रा. भूगाव) आणि अक्षय मारुती फड (वय. २४, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहोळ आणि मोहिते हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

याप्रकरणी वैभव भास्कर पोखारे (वय ३२, रा. किरकटवाडी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार उत्तमनगरमधील देशमुखवाडी येथे १३ सप्टेबर रोजी रात्री ७ ते १४ सप्टेबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडला.

मिळालेल्या माहिती नुसार..

फिर्यादी यांची आई मिनाक्षी भास्कर पोखरे या जागृती सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्ष असून त्या स्वयंसेवी संस्था चालवितात. रेल्वे स्थानकात स्टॉल मिळवून देते, असे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते.

यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. त्यातून आरोपींनी मिनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना उत्तमनगरमधील रुद्र हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. त्या तेथे आल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. त्यांना मोहोळ याच्या घरी नेऊन तेथे डांबून ठेवून मारहाण केली. तेथून फिर्यादी यांना फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. खंडणी विरोधी पथकातील पोलिस नाईक शंकर संपते यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांनी प्राप्त माहितीची खातरजमा करून याबाबत खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कळविले.

त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने त्यांचा शोध घेऊन दोघींची सुटका केली व चौघांना अटक करुन त्यांना उत्तमनगर पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!