Pune Crime News : वाढदिवसाला मनासारखे गिफ्ट दिले नाही म्हणून पत्नीच्या ठोश्यात पतीचा मृत्यू..
Pune Crime News : पुण्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. Pune Crime News
निखिल पुष्पराज खन्ना (वय.३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणुका निखिल खन्ना (वय.३८) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. काल (ता.२३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला.
मिळालेल्या ममाहिती नुसार, निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. काल (ता.२४) दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.
त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता. मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत.
वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत आई-वडील पत्नी असे चार जण ते राहतात. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी रेणुका खन्ना हिला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.