Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार! ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, ११ मुलींची सुटका…

Pune Crime News पुणे : बाणेर भागातील एका उच्चभ्रु परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलवर व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या क्रमांकावरून सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. बाणेरमधील दोन बड्या हॉटेलवर मध्यरात्री छापेमारी करत ११ मुलींची सुटका करण्यात आली असून एक नवी मुंबईची तर इतर परराज्यातील मुली असल्याची माहिती आहे.
गेल्याच आठवड्यात राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मुलींवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या माहितीवरून पुन्हा सामाजिक सुरक्षा विभागाने ही छापेमारी करत कारवाई केली आहे. बाणेरमधील बड्या हॉटेलवर मध्यरात्री छापेमारीकरून तब्बल ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे. Pune Crime News
शहरातील अवैध प्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. यादरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात एका बड्या हॉटेलमध्ये छापेमारीकरत पुणे पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्री आणि दोन रशियन मुलींची सुटका केली होती. याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हे एजंट परराज्यात राहून पुण्यात ऑनलाईनच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते. पुढच्या तपासात काही एजंटची आणखी माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक तयारकरून त्यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, या माहितीची खातरजमा केली. त्यानूसार, मध्यरात्री बाणेर भागातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा या हॉटलमध्ये ठेवण्यात आलेल्या ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे.