Pune Crime News : टेरेसची चावी ठेवण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत केले धक्कादायक कृत्य, सिंहगड येथील संतापजनक घटना..


Pune Crime News : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

टेरेसची चावी ठेवण्याच्या बहाण्याने घरात घसुन १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५५ वर्षाच्या नराधमावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा धक्कादायक प्रकार १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime News

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (ता.५) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजी महिपती कोंडेकर (वय. ५५ रा. धायरी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्या बिल्डिंगखाली दुकान आहे. आरोपी शिवाजी कोंडेकर याने टेरेसची चावी देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितला. मुलीने दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने घरात घसून फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन केले.

मुलीने त्याला विरोध केला तरी त्याने जबरदस्तीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!