Pune Crime News : प्रियसीने प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयांचे कर्ज, मात्र त्याने हप्ते न भरल्याने उचलले ‘हे’ पाऊल…


Pune Crime News पुणे : एका तरुणीला आपल्या प्रियकरामुळे जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

हडपसर परिसरातील मांजरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणी उर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय.२५) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. आदर्श अजयकुमार मेनन (वय. २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, प्रियकर आदर्शच्या सांगण्यावरून राणीने तीन लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते प्रियकर फेडणार होता. मात्र आश्वासन देऊनही प्रियकराने कर्ज न फेडल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

राणी आणि आरोपी आदर्श या दोघांचे प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून तिने वेळोवेळी क्रेडिट कार्डवरुन पर्सनल लोन आणि इतर पाच ते सहा लोन ॲपवरून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते पैसे प्रेयसीने आदर्शला खर्च करण्यासाठी दिले होते.

या कर्जाचे हप्ते आरोपी आदर्श फेडणार होता. मात्र त्याने ते वेळोवेळी कर्जाचे हफ्ते फेडलेच नाही. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण देखील झाले.

यानंतर अखेर या मानसिक त्रासाला वैतागून तिने गुरुवार (ता. १४ ) रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!