Pune Crime News : पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयावर चाकूने वार करत केली मारहाण, पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना…
Pune Crime News : पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला मेहुणा आणि सासऱ्याने बेदम मारहाण करुन चाकूने वार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१२) रात्री दहा वाजता विशालनगर, वाकड येथे घडली आहे.
याप्रकणी आदित्य रजनीकांत मंगरुळे (वय. २६, रा. तुळशीबाग, सोलापूर रोड, हडपसर, पुणे) असे जखमी जावयाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, मेहुणा स्वप्नील तेजराव रणीत (वय 34), सासरे तेजराव रणीत (दोघे रा. हॉटेल सयाजी मागे, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आदित्य यांची पत्नी माहेरी वाकड येथे आली आहे. त्यामुळे फिर्यादी पत्नीला भेटण्यासाठी वाकड येथे आले. त्यावेळी मेहुणा स्वप्नील याने फिर्य़ादी यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकुने दंडावर व मानेवर चाकूने वार करुन जखमी केले.
दरम्यान, सासरे तेजराव यांनी आदित्य यांना लाकडी बांबुने कपाळावर व डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोटे करीत आहेत.