Pune Crime News : जमिनीच्या वादातून तरुणीला जिवंत गाडले, पुण्यातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..


Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून एकधक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द गावात घडला आहे.

२५ ते ३० जणांनी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत खड्डा खणून तरुणावर माती टाकली. तरुणीला जिवंत गाडल्याचा पुण्यातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा प्रकार पोलिसांसमोर घडल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. दरम्यान, पिडीत मुलीने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करुन संबंधीत पोलिसांवर व गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. Pune Crime News

दरम्यान, २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस कर्मचारी औदुंबर आढवाल, संभाजी नथू खोपडे, ज्ञानोबा ओव्हाळ, निखील गायकवाड, बाळू भोरोकर, उमेश धायगावे, संग्राम गुजर, स्वप्निल भुरुक, ज्ञानेश्वर भुरूक, मुंबईचे पाच गुंड, तीन ट्रॅक्टर चालक, जेसीबी चालक व इतर अनोळखी पाच जणांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!