Pune Crime News : रिक्षा चोरुन नेण्याचा प्रयत्न जीवावर! रिक्षाचालकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, स्वारगेट परिसरातील घटना..
Pune Crime News पुणे : स्वारगेट भागात चार रिक्षा चालकांनी एका तरुणाचा बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (ता.२४) रात्री सात ते आठ या दरम्यान गणेश क्रिडा येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. पोलिसांनी चार रिक्षाचालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime News
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, सचिन राजेंद्र नाईक (वय ३२, रा. धनकवडी), गणेश राजेंद्र नाईक (वय ३६, रा. आंबीलवाडा), अमोल वसंत घोलप (वय ३८, रा. कात्रज), प्रकाश सखाराम घाटे (वय २०, रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी रिक्षाचालक आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, दोन दिवसांपुर्वी सायंकाळी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंचासमोर उभा असलेली रिक्षा अनोळखी तरूण पळवून घेऊन जात होता. तेव्हा काही जणांनी त्याला पाहिले. पाठलाग करून त्याला पकडलेही.
रिक्षा चौघा आरोपीपैकी एकाची होती. दरम्यान, त्याला पकडल्यानंतर चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तर लाकडी दांडके त्याच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. सर्वजन फरार झाले होते.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. त्याचा तपास करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी संगनमत करुन तरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.