Pune Crime News : दंडात्मक कारवाई केल्याने आला राग, पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यातच घातला दगड, भारतीय सैन्य दलातील जवानाला अटक..
Pune Crime News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pune Crime News
वाहतुकीचे नियमन करत असताना पोलिस अंमलदार यांनी ट्रिपल जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने बाचाबाची झाली होती. कारवाई केल्याचा राग मनात धरून पोलीस अंमलदाराच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. Pune Crime News
ही घटना बुधवारी (ता.२५) रात्री सातच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली. ढावरे यांनी दीड महिन्यापूर्वी आरोपीवर दंडाची कारवाई केली होती.
रमेश ढावरे असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ढावरे यांच्या डोक्याची कवटी फुटली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी फरासखाना वाहतुक विभागाचे पोलीस कर्मचारी पंकज शंकर भोपळे (वय. ३६) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव संभाजी मनगटे (ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर) याच्यावर नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी वैभव मनगटे हा भारतीय सैन्य दलात नेमणुकीस आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी पंकज भोपळे जखमी रमेश ढावरे व इतर पोलीस कर्मचारी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ वाहतुकीचे नियमन करत होते.
पोलीस अंमलदार रमेश ढावरे यांनी आरोपी वैभव मनगटे याच्यावर दीड महिन्यापूर्वी ट्रिपल सिट गाडी चालवल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
त्यानंतर, आरोपी वैभव मनगटे याने बाचाबाचीचा राग मनात धरुन त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार (ता.२५) चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला.
त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढारे यांच्या डोक्यात जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान,रमेश ढावरे यांच्या डोक्याची कवटी फुटली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभंग करीत आहेत.