Pune Crime News : धक्कादायक! गर्भवती महिलेला शेजाऱ्याने केली बेदम मारहाण, महिलेच्या पोटातील अर्भक दगावले, घटनेने उडाली खळबळ..


Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून शेजारी राहणाऱ्या एका गरोदर महिलेला बेदम मारण्यात करण्यात आल्याने महिलेले मारहाणीत तिच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने त्यांना वेदना होऊ लागल्या.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. खळबळ उडवून देणारी ही घटना मंगळवार पेठेतील यारखान कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. Pune Crime News

याप्रकणी महिलेचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली असून एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवाज नासिर खान (वय २७, रा. चौथा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत रफीया खान, नासिर खान आणि सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू माधवराव चित्रावार (वय २५, रा. दुसरा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी नवाज खान याने २७ मार्च रोजी फिर्यादी यांच्या दारावर लाथ मारली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी राजू चंद्रावर यांची पत्नी मीरा आणि त्यांचा मानलेला भाऊ गणेश कांबळे हे गेले होते.

त्यावेळी आरोपी नवाज खान याने त्याची आई रफिया खान, नासिर खान या सर्वांसोबत मिळून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. मीरा चित्रवार या गरोदर असल्याचे आरोपींना माहिती होते. तरी देखील तिच्या पोटामध्ये लाथा मारून मारहाण करण्यात आली.

तिच्या पोटातील अर्भक मरू शकते याची जाणीव असताना देखील आरोपींनी जाणीवपूर्वक तशी कृती केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर नवाज खान याने फिर्यादीच्या दुचाकी गाडीवर दगड मरून तिचे नुकसान केले. तर, सलमान उर्फ टिपू शेख याने फिर्यादी यांना फोन करून ‘पोलिसात तक्रार दाखल केलीस तर तुला जीवे ठार मारीन’ अशी धमकी दिली.

दरम्यान, गरोदर अवस्थेमध्ये पोटात मार बसल्याने त्यांना रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या पोटातील अर्भकाचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!